loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी: महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर; भाजप ११ तर शिवसेना ६ जागांवर लढणार

सावंतवाडी (प्रतिनिधी) - तब्बल ९ वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या चार वर्षांपासून असलेल्या प्रशासकीय राजवटीनंतर आता निवडणुकांचे बिगुल वाजले असून, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी महायुतीचा (भाजप आणि शिवसेना-शिंदे गट) जागावाटपाचा फॉर्म्युला आज जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जागांचा पेच सुटला असला, तरी इच्छुकांच्या बंडखोरीचे मोठे आव्हान नेत्यांसमोर उभे ठाकले आहे. ​जागावाटपाचे समीकरण (सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ) ​खासदार नारायण राणे यांनी जाहीर केलेल्या सूत्रानुसार, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी भाजप ११ जागांवर, तर शिवसेना ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. पंचायत समितीसाठी मात्र दोन्ही पक्षांमध्ये १७-१७ जागांचा समसमान फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ आहेत. यात जिल्हा परिषदेच्या जागांचे गणित पुढील राहण्याची शक्यता आहे. ​भाजप (६ जागा): माडखोल, कोलगाव, तळवडे, माजगाव, मळेवाड आणि बांदा. ​शिवसेना (३ जागा): आंबोली, इन्सुली आणि आरोंदा. ​पंचायत समितीच्या १८ जागांसाठी दोन्ही पक्ष ९-९ अशा समसमान जागा लढवणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने माडखोल, कलंबिस्त, विलवडे, कारिवडे, मळगाव, चराठे, शेर्ले, न्हावेली, सातार्डा आणि तांबोळी या मतदारसंघांचा समावेश आहे. ​ही निवडणूक भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या थेट नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. जागावाटपाच्या या सूत्रामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची गोची झाली असून, कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान या दिग्गज नेत्यांपुढे असेल. उद्या (१९ जानेवारी) पर्यंत उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

​गेल्या ९ वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी न मिळाल्यास असंतोष पसरण्याची चिन्हे आहेत. सावंतवाडीतील काही इच्छुक उमेदवार पर्यायी मार्गांचा विचार करत असल्याची चर्चा आहे. यात प्रामुख्याने 'ठाकरे शिवसेना' किंवा 'कणकवली शहर विकास आघाडी' प्रमाणे स्वतंत्र पॅटर्न तयार करून निवडणूक रिंगणात उतरण्याची चाचपणी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर स्वकीयांचेच आव्हान उभे राहते की काय, याकडे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg