loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुक्यातील रोवले उंबरशेत येथून मांदिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन महिन्यांत दुसऱ्यांदा बॉक्साइटने भरलेला डंपर उलटला

दापोली : तालुकीयातील रोवले उंबरशेत येथून मांदिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उत्खनन केलेल्या बॉक्साइटने भरलेला एक डंपर आज पुन्हा अपघातग्रस्त झाला. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांत याच परिसरात असा दुसरा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर अपघात ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी रस्ता पूर्णतः मोकळा व सरळ असून सहज डंपर आडवा पडणे शक्य नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र या मार्गावरून सातत्याने ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने ये-जा करत असल्याने वाहनावरील ताबा सुटून असे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असून, भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वेगमर्यादा व वाहतूक नियंत्रणाबाबत कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg