loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार रामभरोसे; नागरिकांची प्रचंड गैरसोय

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू असताना, भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वच्या सर्व चारही शिपाई मालवण येथे कामगिरीवर धाडण्यात आल्याने, कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. तर भुमीलेख अधिकारी विनायक ठाकरे यांच्याकडे दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुका पदभार असल्याने ते ओरोस येथे गेले होते. ​कार्यालयात चौकशीसाठी गेलेल्या नागरिकांनी धक्कादायक माहिती दिली आहे. कार्यालयातील शिरस्तेदारांना गेल्या ११ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. एकीकडे अपुरा कर्मचारी वर्ग आणि दुसरीकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न, यामुळे या विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ​जिल्ह्यात जमिनींच्या व्यवहारांचा ओघ वाढल्याने भूमी अभिलेख विभागावर कामाचा मोठा ताण आहे. मालवण कार्यालयातील प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव केली जात आहे. याचाच फटका सावंतवाडीतील स्थानिक कामकाजाला बसला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"मालवण येथील भूमी अभिलेख कार्यालयात कामांचा मोठा डोंगर साचला आहे. या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी सर्व तालुक्यांच्या भूकरमापकांना शनिवार आणि रविवारी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व्हेअरना कामात अडथळा येऊ नये आणि त्यांनी कामांची पूर्वतयारी (फाईल्स ओके करणे) करून ठेवावी, यासाठी सावंतवाडीच्या शिपायांना आज मालवण येथे पाचारण करण्यात आले आहे." असे विनायक ठाकरे, भूमी अभिलेख अधिकारी यांनी बोलताना सांगितले. ​महत्त्वाच्या कामांसाठी दूरवरून आलेल्या नागरिकांना कार्यालयात शिपाई किंवा पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने कामाचे नियोजन करताना स्थानिक नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg