loader
Breaking News
Breaking News
Foto

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गुहागर प्रशासन सज्ज

आबलोली (संदेश कदम) - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर गुहागर तालुक्यातील प्रशासन या निवडणुकांसाठी सज्ज झालेल आहे. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी तालुक्यामध्ये 145 केंद्र असून त्या केंद्रांवरती पुरुष 44,115 व महिला 55,617 अशा एकूण 96,832 मतदार असणार आहेत. गुहागर तालुक्यातून जिल्हा परिषद रत्नागिरीसाठी एकूण 5 गट आहेत व पंचायत समिती गुहागरसाठी एकूण 10 गट असणार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एकूण 20 पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यात 232 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच 2 भरारी पथकांची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे. अशी माहिती गुहागर तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी गुहागर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg