loader
Breaking News
Breaking News
Foto

अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा उपक्रम, सत्कोंडी व कांबळेलावगणमध्ये वॉटर एटीएम कार्यान्वित

रत्नागिरी (संतोष कांबळे) - महाराष्ट्र फाऊंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या पंचम प्रकल्पांतर्गत सत्कोंडी व कांबळेलावगण येथील ग्रामस्थ, महिला आणि शाळकरी मुले-मुली आता निर्जतुंनक केलेले शुध्द पाणी, एटीएम कार्ड वापरुन पिणार असून आज पंचम प्रकल्पांतर्गत वॉटर एटीएमचे उदघाटन महाराष्ट्र फाऊंडेशनच्या संचालिका रेश्मा सांबरे यांच्या हस्ते झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी यशदाचे कार्यक्रम समन्वयक गिरीश कुलकर्णीं, पंचमचे प्रकल्प समन्वयक दत्ता गुरव, सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश थुल, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत कुळ्ये, उपसरपंच चंद्रकांत मालप, प्रमुख मानकरी संजय बैकर, पंचम प्रकल्प समन्वय संस्था हेरीटेज संस्थेचे संचालक आर्यवर्धन अपर्णा संतोष, ग्रामपंचायत सदस्य अरुण मोर्ये, अजय काताळे, निकिता शिगवण, गाव प्रमुख भाऊ काताळे, किशोर शिवगण, प्रभाकर बंडबे, संतोष थुल, अनंत जाधव, जयवंत थुल, प्रभाकर बैकर यांच्यासह गावातील महिला, युवक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कांबळेलावगण येथील मराठी शाळेजवळ वॉटर एटीएम सुरू झाले असून या कार्यक्रमाला गाव प्रमुख प्रकाश मालप, माजी सरपंच प्रणाली मालप, संजय बलेकर, सचिन बलेकर नारीशक्ती शेवगा उत्पादक गटाच्या सर्व महिला, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. पंचम प्रकल्पामध्ये सत्कोंडी व कांबळेलावगण गावात महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, गरिबी निर्मूलन अशा पाच विषयावर काम सुरू असून महाराष्ट्र फाउंडेशनच्या सहाय्याने शेवगा लागवड करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg