loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल तर स्वीकृत नगरसेवकपदी अमरदीप परचुरे व संतोष सांगळे यांची निवड

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेना युती झाली होती. यात भाजपला नगराध्यक्षपद सोडण्यात आले होते तर शिवसेनेला उपनगराध्यक्षपद सोडण्यात आले. जनतेतून भाजपच्या नीता मालप या निवडून आल्या तर युतीचे १७ पैकी १३ नगरसेवक निवडून आले होते. उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. पालकमंत्री उदय सामंत यांनी उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल व स्वीकृतसाठी अमरदीप परचुरे यांची नावे निवडली होती. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या आदेशानुसार स्वीकृत नगरसेवक पदी संतोष सांगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष नीता मालप, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, गुहागर शहर अध्यश नरेश पवार, भाजपचे गटनेते उमेश भोसले, शार्दुल भावे, शिवसेना, शहर प्रमुख निलेश मोरे, राकेश साखरकर, शिवसेनेचे गटनेते अमोल गोयथळे, व सेना भाजप युतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजप सेनेचे वरिष्ठ नेते यांनी दिलेली संधी व शहरवासीयांनी दिलेली साथ यामुळे पुढील पाच वर्षात गुहागरला अभिमान वाटेल असेच काम सर्व नगरसेवकांच्या साथीने करू. तसेच गुहागरतील पर्यटन व्यवसाय चालना देण्यासाठी तसेच गुहागर शहरातील मूलभूत रस्ते, पाणी आरोग्य अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार असल्याचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रदीप पेंडल यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg