loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषद समोरील ’त्या’ रस्त्यावरील वाहतूक कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष?

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरात सध्या वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली असून, याचा मोठा फटका स्थानिक नागरिक आणि ग्राहक, पर्यटक यांना बसत आहे. विशेषतः सावंतवाडी नगरपरिषदेसमोर असलेल्या मुख्य रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते, मात्र येथील वाहतूक व्यवस्था हाताळण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे. नगरपरिषद कार्यालयासमोर नेहमीच वाहनांची ये-जा सुरू असते. या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असतात, मात्र त्यांचे लक्ष केवळ नगरपरिषदेच्या अगदी समोर असलेली कोंडी दूर करण्यापुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहराच्या इतर महत्त्वाच्या चौकांत आणि अंतर्गत रस्त्यांवर मात्र वाहनधारकांना तासन् तास अडकून पडावे लागत आहे. मंगळवारी सावंतवाडीचा आठवडा बाजार भरतो. या दिवशी तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक शहरात येतात. परिणामी, मुख्य रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी होते.

टाइम्स स्पेशल

मंगळवारी सकाळी, दुपारी आणि विशेषतः संध्याकाळच्या वेळी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असते. अरुंद रस्ते आणि त्यातच होणारी बेशिस्त पार्किंग यामुळे पादचार्‍यांना चालणेही कठीण झाले आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केवळ एकाच ठिकाणी पोलीस तैनात न ठेवता, संपूर्ण मुख्य बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी नियोजनबद्ध बंदोबस्त असावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे वेळेचा अपव्यय होत असून प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी भावना व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg