loader
Breaking News
Breaking News
Foto

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) : पुणे–सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री 11.45 वाजता देवडी फाटा (ता. मोहोळ) येथे भीषण अपघात झाला. पनवेलहून अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी निघालेली इर्टिगा कार (MH-46 Z 4536) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. या अपघातात कारमधील सहा प्रवाशांपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कार रस्त्यापासून 10 ते 15 फूट अंतरावर झुडपांमध्ये जाऊन अडकली. मृतदेह वाहनात अडकले असल्याने बचावकार्य करताना मोठी अडचण निर्माण झाली. जखमी महिला ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर 7, पनवेल) यांना तातडीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत व जखमी सर्वजण एकमेकांचे मित्र असून धार्मिक भावनेतून अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी निघाले होते. या अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. मोहोळ पोलीस निरीक्षक शेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून मृतकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. रात्रवेळी वाहन चालवताना वेगमर्यादा व सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्त्व या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

अक्कलकोट दर्शनासाठी निघालेल्या पनवेल मधील सहा मित्रांपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg