loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर समुद्रकिनाऱ्याला पर्यटन उपसंचालकांची भेट

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर 'समुद्र चौपाटीला ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा प्राप्त झाल्यानंतर अंतिम मानांकनासाठी कराव्या लागणाऱ्या विविध सुविधांची पाहणी करण्यासाठी पर्यटन विभागाच्या उपसंचालक प्रज्ञा मनोहर, पर्यटन विभाग उपअभियंता ऋषिकेश मारकर यांनी गुहागर समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. यामुळे ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गुहागर समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा प्राप्त झाला आहे. मार्च अखेरपर्यंत मानांकनासाठी आवश्यक ३३ सोयी-सुविधांची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. तहसीलदार परीक्षित पाटील,मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी पर्यटन उपसंचालक प्रज्ञा मनोहर व उपअभियंता ऋषिकेश मारकर यांना समुद्र चौपाटीवरील शासकीय जागा तसेच प्रत्येक विभागाची असलेली जागा दाखवली. या चौपाटीवर सुरुबनामध्येच कोकणी खाद्याचे विविध स्टॉल कसे उभारता येतील. वॉकींग ट्रॅक, त्यावर पथदीप, बैठक व्यवस्था कोठे बसवावी, एखादे पार्क कसे सुरू करता येईल. चौपाटीवर जाण्यासाठी योग्य नैसर्गिक साकव, स्वच्छतागृह कोठे उभारावे आदींची पाहणी करण्यात आली. याबाबतचा अंतिम आराखडा तयार करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचेही ठरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाहणी करत असताना समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या डॉल्फीनचेही दर्शन अधिकाऱ्यांना झाले. त्याचबरोबर 'चौपाटीवरील असलेली स्वच्छता यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी अधिक समाधान व्यक्त केले. पूर्वीच्या प्रकल्पांबाबत माहिती घेतली. सीव्हयूसाठी छोटे छोटे मनोरे उभारण्याचा मानस व्यक्त केला. उपस्थित अधिकाऱ्यांनी ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी गुहागरमधील स्थिती पोषक असल्याचे स्पष्ट करत लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठीच नियोजन केले. चौपाटी अधिक स्वच्छ व सुशोभित करण्यासाठीची चर्चा यावेळी करण्यात आली . यावेळी एमएमबीचे क्षिरसागर, वनपाल अमित निमकर यांच्यासह भूमी अभिलेख व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg