loader
Breaking News
Breaking News
Foto

मोहोपाडा थांब्याजवळ ट्राफिकचा विळखा; रसायनी पोलिसांची कारवाई

रसायनी (राकेश खराडे) - मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळील मैदान ते विजवितरण कार्यालय या रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे अतिक्रमण, रस्त्यालगतच्या हातगाड्या यामुळेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले असून, याची गंभीर दखल घेत रसायनी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. यातच मौजे मोहोपाडा ग्रामस्थांनीही गाव बैठकीत स्थानिक सदस्यांच्या उपस्थितीत ठराव घेवून रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोहोपाडा परिसरातील मुख्य बाजारपेठेत बेकायदेशीर पार्किंग, रस्त्यावर उभ्या केलेल्या हातगाड्या, तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, यामुळे सतत ट्राफिक जाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांनी विशेष वाहतूक मोहीम राबवून बेकायदेशीररित्या उभ्या केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच अडथळा निर्माण करणार्‍या फेरीवाल्यांना हटवून रस्ता मोकळा करण्यास सुरूवात केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर चलन काढण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी पोलीस प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, ही कारवाई केवळ एकदाच न होता भविष्यातही नियमितपणे सुरू राहणार आहे. नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी व व्यापार्‍यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन रसायनी पोलिसांनी केले असून मौजे मोहोपाडा ग्रामस्थ मंडळ यांनी रस्त्यावरील अतिक्रमण, हातगाड्या हठविण्यासाठी पाऊल उचलले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg