loader
Breaking News
Breaking News
Foto

​वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे 'स्वरचित काव्यवाचन' स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ले : वेंगुर्ले येथील नगर वाचनालयातर्फे 'कै. सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृती' प्रित्यर्थ स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे (वर्ष ३ रे) आयोजन करण्यात आले आहे. श्री.अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत ही स्पर्धा नगर वाचनालयाच्या सभागृहात पार पडणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींसाठी ही एक उत्तम संधी आहे. ​पात्रता: ही स्पर्धा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. ​कविता: स्पर्धकाने स्वतः लिहिलेली (स्वरचित) एक कविता कागदाच्या एकाच बाजूला लिहून किंवा टाईप करून पाठवायची आहे. कविता जास्त दीर्घ नसावी. पाठवलेली कविता स्वतःचीच असल्याचे घोषणापत्र सोबत जोडणे अनिवार्य आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राप्त कवितांपैकी निवडक २५ कवितांचे वाचन वाचनालयाच्या सभागृहात होईल. निवडलेल्या कविता व इतर उल्लेखनीय कवितांचा संग्रह पुस्तिका स्वरूपात प्रसिद्ध केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्यक्ष सादरीकरणानंतर प्रथम तीन क्रमांकांना रोख पारितोषिके दिली जातील: ​प्रथम क्रमांक: रु. ३००१/- ​द्वितीय क्रमांक: रु. २००१/- ​तृतीय क्रमांक: रु. १००१/- ​इच्छुक कवींनी आपल्या कविता दि.२८ जानेवारी पर्यंत संस्थेच्या कार्यालयात टपालाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत आणून द्याव्यात. अधिक माहितीसाठी ta6606001@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन नगर वाचनालय, वेंगुर्लेच्या कार्यवाहांतर्फे करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg