loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रजासत्ताकदिन निमित्ताने दिल्ली राजपथ येथे होणार्‍या अंतिम सादरीकरणासाठी गुरुकुल महाविद्यालय चिपळूणच्या विद्यार्थ्यांची निवड

२६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली राजपथ येथे प्रजासत्ताकदिन निमित्ताने होणार्‍या अंतिम सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवड चाचणी झाली. या निवड चाचणीत महाराष्ट्र संघामध्ये गुरुकुल महाविद्यालय चिपळूणचे विद्यार्थी राज वसंत धाडवे एसवाय-बीएफ, आदित्य प्रदीप दहिवळकर एसवाय-बीएफ, सोहम संजय पवार एसवाय-बीएफ, स्वानंद अरुण पांढरे एफवाय-सीएस यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. तसेच गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी ही कोकणामधील चिपळूणचे सागर अंकुश कुंभार हे महाराष्ट्र टीम मॅनेजर म्हणून दिल्ली येथे काम पाहणार आहेत. ही आपल्या कोकणसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यासाठी या सर्व टीम चे विविध स्तरावर कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र संघाला राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत तसेच चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे माननीय आमदार शेखर निकम, महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष संजय दरेकर, प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे सर्व निवड झालेले सदस्य आपल्या महाराष्ट्राचा डंका दिल्ली राजपथ येते नक्की वाजवतील यात शंका नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg