loader
Breaking News
Breaking News
Foto

वेंगुर्ला येथे उद्या राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण

वेंगुर्ला (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग लोक शिक्षण संस्था, वेंगुर्लाआणि कृषि तंत्र निकेतन, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगत, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आदर्श शेतकरी पुरस्कार २०२५ साठी आलेल्या नामांकन मधून परीक्षण अंती महाराष्ट्र राज्यातील १४ शेतकऱ्यांना उद्या रविवार १८ रोजी वेंगुर्ला येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार - २०२५ चे मानकरी डॉ. उत्तम सूर्यकांत फोंडेकर (मालवण) नारायण अशोक रायकर (ठाणे), ऋषिकेश बाळासाहेब काळे - (करमाळा, सोलापूर), वृषाल विजय ठाकूर( वेंगुर्ला), महेश दिनकर सावंत (देवगड), गजानन विष्णू परब - (कुडाळ), विवेक शांताराम चव्हाण (शिरगाव), चंद्रकांत लक्ष्मण पवार - (म्हसळा, रायगड) विजय हनुमंत मोरे (तासगाव सांगली), पांडुरंग कुंडलिक बरळ इंदापूर पुणे, महेश रामदास संसारे (वैभववाडी सिंधुदुर्ग), डॉ.संभाजी अर्जुन भोसले - (बारामती पुणे), चेमा रामजी गावीत ता. नवापूर जिल्हा नंदुरबार, अरुण बळीराम मगर (पुणे) पुरस्कार वितरण सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग लोक शिक्षण संस्था वेंगुर्ला ऑफिस वेंगुर्ला, येथे आयोजित कार्यक्रमात होणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था वेंगुर्ला अध्यक्ष विनायक ठाकूर व कृषी तंत्रनिकेतन देवगड अध्यक्ष नारायण सावंत यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg