loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपाचा शिवसेना ठाकरे पक्षाकडून पाठलाग

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता पहिल्या तासात अधिक गडद होताना दिसत आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील चांगले मताधिक्य मिळतानाचे चित्र स्पष्ट होत आहे. पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये भाजपा बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य चांगले मिळाल्याने भारतीय जनता पार्टीचा पाठलाग सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. २२७ प्रभागामध्ये ५२ प्रभागांत महायुती आघाडीवर असून ३० जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे. कॉंग्रेस, वंचितचा प्रभाव या निवडणुकीत भाजपाच्या फायद्याचा ठरणार, असे दिसून येते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन शिवसेनेच्या विभागणीमुळे भारतीय जनता पार्टीचा पूरेपूर फायदा होताना दिसत आहे. १५ हजार ९३१ उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. निवडणुक प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. सकाळी १० वाजल्यापासून ४६ प्रभागांत मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणी प्रक्रियेतील बदलामुळे सुरुवातीच्या ट्रेंड आणि अंतिम निकालामधील वेळ वाढू शकते. प्रथम २३ मतदानकेंद्रांवर मतमोजणी सुरु झाली.

टाइम्स स्पेशल

मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही पाळत ठेवणे आणि संगणकीकृत प्रणाली वापरल्या जातील. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही पाळत ठेवणे आणि संगणकीकृत प्रणाली वापरल्या जात आहेत. स्ट्राँग रूम आणि मतमोजणी स्थळावर 23 निवडणूक अधिकाऱ्यांचे अधिकार क्षेत्र आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg