loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणात २१ पासून माघी गणेशोत्सव सोहळा, चार दिवस धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम

चिपळूण : आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी, काविळतळी (ता. चिपळूण) यांच्या वतीने १५ वा माघी गणेशोत्सव सोहळा बुधवार दिनांक २१ जानेवारी ते शनिवार दिनांक२४ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. बुधवारी दि. २१ रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्रींच्या आगमन सोहळ्याने उत्सवाची सुरुवात होणार आहे. गुरुवार दि. २२ रोजी पहाटे ५:०० वाजता श्रींच्या मूर्तीची स्थापना व काकड आरती होईल. सकाळी ८:०० वा शमी, दुर्वा, खोबरे व तुपाने श्रींचे सहस्त्र हवन, सकाळी १०:०० वा जन्मपूजा तर ११:०० वा जन्मोत्सव कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७:०० वा धुपारती व रात्री ८:०० वा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार दि २३ रोजी ५:०० वाजता काकड आरतीनंतर सकाळी ८ ते १०:०० या वेळेत गणेश गायत्री मंत्र पठण होणार आहे. सकाळी १०:० वा श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी ३:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७:०० वा श्रींची धुपारती होईल रात्री ८:०० वा रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव निवड चाचणी स्पर्धा २०२६ होईल. शनिवार दि. २४ रोजी सकाळी ५:०० वा काकड आरती, सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आरोग्य शिबिर, सकाळी ११:०० वा श्रींची अभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळी ५:०० वा श्रींच्या विसर्जन मिरवणूकने उत्सवाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांचा भाविक व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रबोधनीचे अध्यक्ष सचिन (भैय्या) कदम यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg