loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी जि.प. अध्यंक्ष उदय बने अपक्ष निवडणुक लढवणार

रत्नागिरी (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता जाहिर झाली. सोबतच आता सर्वच राजकिय घडमोडींना वेगवान सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि २८ वर्ष शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणुन ओळखले जाणारे उदय बने आता अपक्ष निवडणुक लढवणार आहेत. शिवसेनेतुन जिल्हा परिषदेच्या पाच निवडणुकां गाजवलेले उदय बने यांनी १९९७ सालापासून या पक्षात विविध पदांवर काम केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता मात्र ते ही सहावी जिल्हापरिषद निवडणुक अपक्ष लढवणार असल्याचे बने यांनी सांगितले. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षात एकच गदारोळ उठला आहे. बने गोळप जिल्हा परिषद गटातून ही निवडणुक लढवणार आहेत. जि. प आणि पंचायत समितीच्या फेररचनेनंतर त्यांचे मुळ गाव निरुळ आता गोळप जि. प. गटात समाविष्ठ झाले आहे. आता ते याच गटातुन निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोळप जिल्हा परिषद गटात निरुळ गावासह कोळंबे, तोणदे, भाट्ये, फणसोप, चांदोर, गणेश गुळे आणि गोळप या गावांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

आपली सहावी जि.प निवडणुक ही अखेरची निवडणुक आपण अपक्ष लढवणार असल्याचे बने यांनी सांगितले. त्यामुळे रत्नागिरी जि. प. निवडणुकीच्या इतिहासात उदय बने नविन चमत्कार घडवणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागुन राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg