loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्ञानदानातून आदर्श विद्यार्थी घडवणार्‍या सेवाभावी शिक्षिका रसिका रेवाळे यांना सेवावृत्ती अनंत शिंदे पुरस्कार

खेड - उत्कृष्ट अध्यापनाला आधुनिकतेची जोड देऊन विद्यार्थी प्रिय बनलेल्या रसिका रमेश रेवाळे (खांडेकर) यांना कुणबी सेवा संघ दापोलीचा सेवावृत्ती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचे प्रस्ताव आले होते या सर्वांमधून रसिका रेवाळे यांची निवड झाली आहे. खरोखरच खेड तालुक्यासाठी हा एक अभिमानाचा व गौरवाचा दिवस आहे. रसिका रेवाळे यांनी आपली प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवेची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून केली. त्यानंतर जिल्हा बदलीने त्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामध्ये आल्या. शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शक म्हणून संपूर्ण जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या रसिका रेवाळे यांनी मंडणगडमध्ये अनेक विद्यार्थी नवोदय परीक्षेत व शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिटमध्ये आणले. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्यांच्या तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. आपल्या उत्कृष्ट अध्यापनाच्या जोरावर अल्पावधीतच विद्यार्थी प्रिय शिक्षिका झाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बीडीएस परीक्षतेत अनेक मुलांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल मिळवून दिली. एमटीएस परीक्षेत एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणला. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळविले. व्हिडिओ मेकिंग स्पर्धेमध्ये २०२४ ला त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. आय. टी. एस.परीक्षेचा निकाल शंभर टक्के लावत आंबवली शाळेचे नाव खेड तालुक्याच्या पटलावर एक उत्कृष्ट विद्यार्थी घडवणारी शाळा असे कोरले. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापनामुळेच आजूबाजूच्या गावातील अनेक मुलांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे. निपुण अंतर्गत व्हिडिओ मेकिंग गणित विषय या स्पर्धेमध्ये खेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरापर्यंत मजल मारली. गतवर्षी आंबवली शाळेने रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर यांच्यासह अथक परिश्रम घेतले. आंबवली शाळेने गत तीन वर्षात लाखो रुपयांचा शैक्षणिक उठाव केला आहे. हा शैक्षणिक उठाव मिळवण्यासाठी रसिका रेवाळे यांनी खूप प्रयत्न केले.

टाइम्स स्पेशल

शाळा व्यवस्थापन समिती आंबवलीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व पालक, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी नेहमीच पाठिंबा देऊन अनमोल मार्गदर्शन केले आहे, असे रेवाळे मॅडम नम्रतेने सांगतात. शैक्षणिक कार्य करत असतानाच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेत खेड तालुका महिला प्रतिनिधी म्हणून त्या कार्यरत आहेत. आंबवली विभाग हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्‌यामध्ये संघटना आणखी प्रबळ व्हावी यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. शिक्षकी पेशा ही नोकरी नसून सेवा आहे असे म्हणून मुलांमध्ये देव शोधणार्‍या या विद्यार्थीप्रिय शिक्षिकेला उत्तरोत्तर असेच यश मिळो, अशी प्रार्थना सर्वांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg