loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १६ वे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी (संतोष कांबळे) - तालुक्यातील नाणीज प्रतिष्ठित ग्रामस्थ नारायण शिवराम सावंत यांचे ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले. रत्नागिरी शासकीय महाविद्यालयातील १६ वे देहदान ठरले आहे. कै. सावंत यांच्या पश्चात त्यांचे पुतणे प्रफुल्ल व महेश सावंत आहेत. कै.नारायणराव हे नाणीजचे २५ वर्षे सरपंच होते, तर २५ वर्षं पोलीस पाटील म्हणून सेवा केली. याशिवाय २६ वर्षे गावप्रमुख म्हणूनही काम पाहिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ते मोडीलिपी भाषांतर करून देण्यासाठी विनामोबदला काम करत असत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामपंचायत प्रशासक म्हणून काम करताना महाराष्ट्र राज्यातील पहिल गाव म्हणून नाणीज ग्रामपंचायत येथे घरकुल योजना व कुटुंब कल्याण योजना तसेच शासकीय नळपाणी योजना शासनामार्फत प्रभावीपणे राबविल्या होत्या, त्याबद्दल त्यांना शासनाकडून विशेष पुरस्कारदेखील देण्यात आलेला आहे. सदर मरणोत्तर देहदानावेळी नाणीजचे पोलीस पाटील नितीन कांबळे, संदिप सरफरे, श्रीकांत सावंत, अशोक सावंत, गणेश सावंत, गणपत गुरव, संदेश सावंत, अशोक सावंत, प्रविण सुर्वे, विशाल सरफरे, विकास सरफरे, मकरंद सावंत, सावंत खेडशी, सुर्यकांत सावंत व एम.बी.कांबळे हे उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

सदर देहदान प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, राज पेडणेकर, मिहिर लोंढे यांनी काम पाहिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

नाणीज प्रतिष्ठित ग्रामस्थ नारायणरावांचे देहदान

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg