loader
Breaking News
Breaking News
Foto

मडुरा येथे व्हीएन नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) - व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल, मडूरा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी पार पडले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सायरा कन्स्ट्रक्शन अँड वास्तू डेव्हलपर्सचे डायरेक्टर शैलेश लाड तसेच गोगटे वाळके महाविद्यालय, पानवळ-बांदाचे प्राचार्य गोविंद काजरेकर आणि ओंकार फाउंडेशनचे गुणेश गवस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना गोविंद काजरेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात इंग्रजी भाषेचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे शैलेश लाड यांनी मराठी भाषेचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगतानाच, इंग्रजी भाषेचे जागतिक स्तरावरील महत्त्वही स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईचे अध्यक्ष मंगेश कामत यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रामचंद्र कुडके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर गुणेश गवस यांनी प्रभावी व ओघवत्या भाषणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या ‘क्रिस्टल’ या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल, बांदाचे प्राचार्य मनाली देसाई, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष प्रियांका परब, शाळा समिती सदस्य विष्णू सावंत तसेच मुख्याध्यापिका नीती साळगावकर उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक अहवाल सहशिक्षिका मयुरी कासार यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेलांकनी रॉड्रीक्स यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपशिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वरा राठवड यांनी मानले. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची सांगता जल्लोषात झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg