loader
Breaking News
Breaking News
Foto

नासा इस्रो दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींची कोंडगाव बाजारपेठेतून भव्य मिरवणूक

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील आदर्श जिल्हा परीषद पद्मा कन्या शाळा साखरपा या शाळेतील विद्यार्थिनी आयशा अब्दुल्ला खान व संस्कृती निलेश तरंगे या विद्यार्थिनींची नासा इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली आणि कोंडगाव साखरपा व आजू बाजूच्या परिसरात आनंदाला उधाण आले. या उधाणाचे रूपांतर त्यांचे भव्य दिव्य अशा फुलांनी सजवलेल्या वाहनातून संपूर्ण बाजारपेठेतून ढोल पथकाच्या गजरात, लेजीम पथकाचा ठेका आणि पद्मा कन्या शाळेचा जयघोषानी सारा परिसर दुमदुमून गेला. हिऱ्याला घडविण्यासाठी कारागीराची गरज असते, त्याप्रमाणे या निवड झालेल्या विद्यार्थिनींरुपी हिऱ्या मोत्याला घडविण्यासाठी व आपल्या ध्येयपूर्तीसाठी व शाळेचे नाव यशोशिखरावर नेण्यासाठी प्रयत्नाची शर्थ लावणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका नीलम शेडे यांची देखील फेटा बांधून भव्य मिरवणूक काढली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून यश खेचून आणणाऱ्या नीलम शेडे यांनी शाळेचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कार्यकक्तृवाला अनेकांनी सलाम केला. मिरवणुकीत शाळेच्या सर्व विद्यार्थिनी तल्लीन होऊन आनंद साजरा करीत होत्या. जणू काही सणच आला. प्रत्येक वेळ ही ज्ञानाचा कन असतो तो मी कधीच वाया घालविणार नाही. माझ्याकडील ज्ञान मी ज्या ज्या ठिकाणी ज्ञानदानाचे काम करीत असेन त्या त्या ठिकाणच्या विद्यार्थी वर्गाला घडविण्याचे काम माझ्या हातून घडत राहील आणि विद्यार्थिवर्गाला यशाच्या दैदीप्यमान शिखरावर पोहचविण्याचे कार्य याहीपुढेही सदैव करणार असल्याचे मत इस्रोसाठी देखील निवड झालेल्या शेडे यांनी व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

यावेळी रिक्षा मालक बाळा घागरे, बंड्या पोटफोडे यांनी यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षिका यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कोंडगाव प्रभारी सरपंच श्रद्धा शेट्ये, सदस्या हर्षा आठल्ये, केंद्रप्रमुख दिव्या भाटकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य गिरीश कोळी, मुख्याध्यपिका चारुता खानविलकर, उप शिक्षिका विद्या कदम, संयमी बांडागळे, पदवीधर शिक्षिका नीलम शेडे, उप शिक्षक सुनील चौरे, शिक्षण सेवक रोहन पाटील, संदीप जोयशी व इतर सदस्य, साखरपा नं१ शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक व बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg