loader
Breaking News
Breaking News
Foto

मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी २१ जानेवारीपासून संपाचा इशारा

​रत्नागिरी (प्रतिनिधी) -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पाऊल उचलले आहे. इतर विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही शासन सेवेत नियमित करावे, या मुख्य मागणीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, १० दिवसांत निर्णय न झाल्यास २१ जानेवारी २०२६ पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मनरेगा अंतर्गत राज्य स्तरापासून ते पंचायत समिती स्तरापर्यंत MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई अशा विविध पदांवर कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील गरजू हातांना काम मिळवून देण्यात आणि महाराष्ट्र राज्याला 'रोहयो'मध्ये अव्वल स्थानी राखण्यात या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, शासनाने सर्वशिक्षा अभियान आणि ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले असताना, मनरेगा कर्मचाऱ्यांबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

टाइम्स स्पेशल

​प्रमुख मागण्या: ​१. नियमित समायोजन: इतर योजनांमधील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मनरेगामधील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करावे. २. खाजगी कंपन्यांना हद्दपार करा: ५-२ इन्फोटेक (5-2 Infotech) कंपनीमार्फत होणारी 'अवैध' भरती प्रक्रिया तात्काळ थांबवून ही कंपनी रद्द करावी. ३. समान काम समान वेतन: सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती 'राज्य निधी असोसिएशन' (सोसायटी) मार्फत करून त्यांना 'समान काम समान वेतन' धोरण लागू करावे. ४. स्वतंत्र यंत्रणा: इतर विभागांप्रमाणे मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून पदनिहाय आकृतीबंध निश्चित करावा. ​"रोहयो विभागामध्ये खासगी मनुष्यबळ पुरवठादार कंपन्यांच्या हस्तक्षेपामुळे जुन्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. एकीकडे आम्ही राज्याचा विकास साधत आहोत आणि दुसरीकडे आमचेच भविष्य अंधकारात आहे," अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर १० दिवसांच्या आत शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार करून मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राज्यातील हजारो कर्मचारी संपावर जातील. यामुळे ग्रामीण भागातील कामांचे नियोजन आणि मजुरांच्या मजुरीचे प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg