loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचा लायन्स क्लबकडून सत्कार

खेड (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय लायन संघटना अंतर्गत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्यावतीने नव्याने निवडून आलेल्या खेड नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचा आणि नगरसेवकांचा पर्यावरणपूरक सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विरेंद्र चिखले हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन महेंद्र शिरगावकर, खजिनदार लायन माणिक लोहार, तसेच झोन चेअरमन लायन मिलिंद तलाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सत्कार सोहळ्यात नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतिश (पप्पू) चिकणे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, निवडणूक प्रमुख व नगरसेवक संजय मोदी, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, भाजपा गटनेते रहीम सहीबोले आणि खेड नगरपरिषदेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान रोप, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. यात नगरसेवक मिनार चिखले, सुनिल दरेकर, भुषण चिखले, प्रमेल चिखले, अरिफभाई मुल्लाजी, स्वप्निल सैतवडेकर, तोसीफ खोत, तसेच नगरसेविका वैभवी खेडेकर, संजना कुडाळकर, दिप्ती शिगवण, निता आंब्रे, आरती पवार, रसिका खेडेकर, अंजुम कुरणे, वर्षा सापते आणि स्वप्नाली चव्हाण यांचा समावेश होता. कार्यक्रमास माजी अध्यक्ष सुरेश चिकणे, पंकज शहा, शंकर पार्ते, राजा जोयसर, ओंकार गोंदकर, रोहन विचारे आणि इतर अनेक लायन्स सदस्यांनी उपस्थिती दर्शवली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg