loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत ‘महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना’ची धडक एंट्री!

चिपळूण ( संतोष पिलके ) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. पारंपरिक पक्षांसह विविध संघटना निवडणूक रणांगणात उतरायची तयारी करत असतानाच, महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना या सामाजिक संघटनेच्या निवडणूक प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संघटनेचे कोकण प्रमुख श्री. सैफ सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, “यावेळेस जाती-पातीच्या राजकारणाला थारा न देता, १८ पगड जातींना सोबत घेऊन चालणारी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.” संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राहुल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुका तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सामाजिक कार्य, पोलिस कुटुंबांचे प्रश्न, सामान्य जनतेचे हक्क आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर संघटना निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टाइम्स स्पेशल

या सर्व प्रश्नांवर सध्या सस्पेन्स कायम असून, उमेदवारांची अधिकृत घोषणा लवकरच श्री. सैफ सुर्वे स्वतः करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, सामाजिक संघटनेचा हा राजकीय प्रवेश जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये नवा इतिहास घडवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत कोकणातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg