loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडमध्ये थोर समाजसुधारक स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात

(खेड - प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये थोर समाजसुधारक स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन तसेच थोर समाजसुधारक स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. तद्नंतर शाळेतील राम करवा व रणवीर मेश्राम या विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, थोर समाजसुधारक स्वामी विवेकानंदांनी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश दिला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करावा. अपयशातून खचून न जाता त्यातून शिकणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने जिजाऊंनी केलेल्या संस्कारांचे आचरण करून आपणही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले.

टाइम्स स्पेशल

यावेळी उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मीनाक्षी निवाते यांनी केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी थोर समाजसुधारक स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg