loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे येथे माघी वारी पायी दिंडीचे उत्साहात स्वागत

खेड (दिलीप देवळेकर) - छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल प्रशालेमध्ये माघी पायी वारी श्री क्षेत्र देवाचा डोंगर ते श्री क्षेत्र पंढरपूर या वारकरी दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या दिंडीचे संस्थापक व आयोजक ह. भ. प गुरुवर्य किशोर महाराज चौगुले सातेरेकर यांच्या सहकार्यामुळे हा एक अत्यंत भक्तीमय आणि उत्साहाचा सोहळा दरवर्षी प्रशालेत विद्यार्थांना अनुभवयास येतो. प्रशालेत वारकरी दिंडीचे उत्साही जंगी स्वागत शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पारंपारिक पद्धतीने (कुंकू-टिळा लावून आणि औक्षण करून) केले. विठ्ठल-रखूमाईचा जयघोष ’पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ आणि ’विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ अशा जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी सुंदर अभंग सादर केले. काही विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळाही सादर केला, जो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील थोर वारकरी परंपरेची आणि संतांच्या शिकवणीची माहिती देण्यात आली. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त आणि एकात्मतेची भावना जोपासण्यास मदत झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg