loader
Breaking News
Breaking News
Foto

उधळे बुद्रुक शाळेच्या उन्नती पवार हिची गगनभरारी, इस्रो दौर्‍यासाठी निवड

खेड - तालुक्यातील उधळे बुद्रुक शाळेतील उन्नती जितेंद्र पवार या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या नासा इस्रो चाळणी परीक्षेत उज्वल यश संपादन करीत इस्रो दौर्‍यासाठी पात्र ठरत गगनभरारी घेतली आहे. शाळेचे तसेच कळंबणी केंद्राचे नाव उज्वल केलं आहे. प्रशालेतील उन्नती जितेंद्र पवार हिने याच वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करीत जिल्हा गुणवत्ता यादीत १२७ वा क्रमांक मिळवून ती यशस्वी झाली. तसेच उन्नती जितेंद्र पवार हिने नवोदय परीक्षेत उज्वल यश मिळवत तिची नवोदय विद्यालय, राजापूर येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली होती. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनीने मिळवलेले यश निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग अंतर्गत ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात आली होती. तालुक्यातून १० विद्यार्थी जिल्हास्तरावर निवडण्यात आले होते. यातून लेखी व मुलाखतीद्वारे उन्नती पवार हिची इस्रो दौर्‍यासाठी निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे संतोष तांबट, रवींद्र जोगळे आणि स्वप्नाली रेडीज यांनी मेहनत घेतली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, मांडवे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर, केंद्रप्रमुख अंकुश उंडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उधळे गावचे सरपंच दयानंद पाष्टे, उपसरपंच मयुरेश पवार, पोलीस पाटील सुनील कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन पवार, तंटामुक्त अध्यक्ष श्री.टेमकर, उद्योजक सुधीर भोसले, ग्रा. पं. सदस्य शफी तांबे, रामभाऊ कदम, रविंद्र कदम, सुभाष पंडम, सुभाष गावडे तसेच कळंबणी केंद्रातील शिक्षकांनी या विद्यार्थिनीचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg