loader
Breaking News
Breaking News
Foto

गोवा मराठा सेवा संघाचे रामचंद्र पाटील यांना “सर्वोत्कृष्ट राज्य प्रदेशाध्यक्ष–२०२६”पुरस्कार प्रदान

दोडामार्ग (प्रतिनिधी) - मराठा सेवा संघाच्या संघटनात्मक विस्तार, सामाजिक कार्यासाठी तसेच नेतृत्वपूर्ण योगदानासाठी मराठा सेवा संघाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पाटील यांना “सर्वोत्कृष्ट राज्य प्रदेशाध्यक्ष – २०२६” या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सिंदखेडराजा जि.बुलढाणा येथे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण करण्यात आले. सोहळ्याचे भव्य व दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास देशातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष तसेच देशभरातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोवा राज्यात मराठा सेवा संघाची प्रभावी संघटनात्मक बांधणी, सामाजिक-शैक्षणिक उपक्रम, समाजप्रबोधनाचे कार्य तसेच सातत्यपूर्ण संघटनात्मक वाढ या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक गतिमान, शिस्तबद्ध व प्रभावी झाल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

टाइम्स स्पेशल

या राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री नवनाथ घाडगे, डॉ. निर्मला पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष – जिजाऊ ब्रिगेड), सुनील महाजन (मध्य भारत), डॉ. सोपान क्षीरसागर (दक्षिण भारत), डॉ. संजय पाटील (उत्तर भारत), इंजि. शिवाजीराजे पाटील (प्रबोधन कक्ष), प्रा. कपिल पिचेराव (कार्यालयीन सचिव), विलास पाटील (तानुबाई बिरजे पत्रकार परिषद), आर. एस. पाटील, सुनील महाजन व गणेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपल्या भावना व्यक्त करताना सत्कारमूर्ती रामचंद्र पाटील म्हणाले, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार, डॉ. सोपानराव शिरसागर यांच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य झाले. हा सन्मान माझा नसून गोवा राज्यातील मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी, सहकारी व कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच हे कार्य शक्य झाल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg