loader
Breaking News
Breaking News
Foto

ना.योगेश कदम यांच्या आमदार निधितून मंजूर झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाकिचा भुमिजन कार्यक्रम दणक्यात संपन्न

दापोली (प्रतिनिधी) - नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शासकीय योजनांच्या शिर्षकाखालील योजनेतून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध झाल्याने दापोलीतील गावागावात विकास कामे सुरू आहेत. अशातच खास बोरीवली येथील लोकाग्रहास्तव पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाकिसाठी मंत्रिमहोदय योगेशदादा कदम यांनी १५ लाख रुपयांचा विकास निधी आपला स्थानिक विकास निधी (आमदार निधी) या शिर्षकाखालील योजनेतून उपलब्ध करून दिला आहे. बोरीवली गावांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या १५ लाख रुपयांच्या विकास निधीतून बोरीवली वरचीवाडी येथे होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकिचे भुमिपूजन पंचनदी ग्रुप ग्राम पंचायतीच्या सरपंच संकल्पा शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या दिमाखात करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना दापोली तालुकाप्रमुख उन्मेष राजे, उप तालुका प्रमुख प्रदिप राणे, माजी सभापती प्रकाश कालेकर, विभाग प्रमुख दिपक घडसे, माजी सभापती प्रकाश कालेकर, ग्राम पंचायत सदस्य महेंद्र रेवाळे, गाव मंडळाचे अध्यक्ष कृष्णा शिगवण, कार्याध्यक्ष रामचंद्र आडविलकर, शिवसेना शाखाप्रमुख अनंत रेवाळे, उप शाखा प्रमुख अनिल रेवाळे, सचिव रविंद्र शिंदे, महीला मंडळ अध्यक्षा निधी आडविलकर, माजी ग्रामपंचायत सदस्या रसिका उजाळ आदिंसह बोरीवली पंचक्रोशीतील नागरिकांसह बोरीवली गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

दापोली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण दापोली विधानसभा मतदार संघात नाम.योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वसामान्यांचे हित साधले जाईल अशी विविध प्रकारची विकास कामे मंजूर आहेत. काही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत, तर काही कामे सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात दापोली मतदार संघात विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे दापोलीत नामदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पक्ष संघटन अधिक मजबूत होत चालले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg