loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी क्रांतीनगर येथे सापडलेल्या अर्भकाला आणण्यासाठी एखाद्या वाहनाचा उपयोग झाला असावा, मातेचा शोध कसून

रत्नागिरी - रत्नागिरीतील क्रांतीनगर येथे एक दिवसाचे अर्भक सापडले होते याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. घटनास्थळी डॉग स्कॉड आणण्यात आले. यावेळी डॉगने झोपडपट्टीतून कानोसा घेत मुख्य रस्त्यापर्यंत येवून शोध थांबविला, त्यामुळे या घटनेत एखाद्या वाहनाचा उपयोग केला गेला असावा, असा संशय बळावला आहे. अर्भकाच्या मातेचा शोध पोलिस लवकरच घेणार आहेत. त्या दृष्टीने तपास यंत्रणेची चक्रे फिरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनास्थळावर अर्भकाला प्रथम पाहणार्‍या व्यक्तीची साक्ष तसेच परिसरातील नागरिकांची साक्ष पोलिस घेत आहेत. रत्नागिरीसह तालुक्यातील काही प्रसुतीगृहात या दोन-तीन दिवसांत कुणी महिला दाखल होती का? याची तपासणी देखील पोलिस यंत्रणेकडून सुरु आहे. घटनास्थळापासून जवळच्या अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजमधून महत्वाचा धागादोरा समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिस सूत्रांनी सांगितले की, या घटनेचा शोध घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून, प्रकरण दूर अंतरावर घडलेले नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg