loader
Breaking News
Breaking News
Foto

शालेय रेखाकला स्पर्धेत श्रेयस जाधव राज्यात तिसरा , ६ लाख विद्यार्थ्यांमधून पटकावेल स्थान

रत्नागिरी(ेवार्ताहर)- राज्य शासनाच्या कला संचालनालयामार्फत शालेय रेखाकला (ड्रॉईंग ग्रेड परीक्षा एलिमेंट्री व इंटरमिजिएट) स्पर्धेत सेंट थॉमस शाळेचा विद्यार्थी व करबुडे गावचा सुपुत्र श्रेयस संतोष जाधव याने चमकदार कामगिरी केल़ी आहे. श्रेयस याने डिझाईन याप्रकारात राज्यात तृतिय क्रमांक पटकावला तर राज्य गुणवत्ता यादीत २१ वे स्थान पटकावल़े या परिक्षेसाठी राज्यभरातून एकुण ६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होत़ा त्यामध्ये रत्नागिरीच्या श्रेयस याची निवड झाल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आह़े

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेसाठी सेंट थॉमस शाळेतील एकूण ४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे. श्रेयस याला लहानपणापासून चित्रकलेची आवड आह़े विविध ठिकाणी त्याने आपली चित्रकला सादर केली आह़े तसेच अनेक शालेय स्पर्धामध्ये भाग घेवून त्याने बक्षिस पटकावले आह़े त्याच्यामधील चित्रकलेचा गुण पाहून त्याच्या शिक्षकांनी त्याला या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले होत़े श्रेयस याच्या रुपाने शाळेतील एक विद्यार्थी राज्यस्तरावर झळकल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आह़े तसेच त्याच्या करबुडे गावामध्ये देखील कौतुक होत आह़े

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg