loader
Breaking News
Breaking News
Foto

सुमन विद्यालय टेरवची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

चिपळूण (संतोष पिलके) : माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल देवरुख आणि सृजन सायन्स सेंटर,देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच देवरुख येथे संपन्न झाले. सदर विज्ञान प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरवने माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात कुमारी तन्वी प्रदीप सागवेकर व कुमार प्रथमेश मनोहर मांडके यांच्या “मल्टीपर्पज वायरलेस अलर्ट सिस्टीम” या उपकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून सदर उपकरणाची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. सदर जिल्हास्तरीय प्रदर्शनाकरिता सुमन विद्यालय, टेरव या प्रशालेमार्फत उच्च प्राथमिक गटात कुमारी विभावरी संतोष वास्कर व कुमार हर्ष विजय गावडे यांनी सादर केलेले “वृद्धांचा सोबती” हे उपकरणही प्रदर्शनामध्ये लक्षवेधी ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्यात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, देवरुख पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट, देवरुख पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नाईक, बळवंतराव, त्रिभुवणे तसेच केंद्रप्रमुख अभिमन्यू शिंदे व शिक्षण विभागाशी निगडित अन्य प्रशासकीय अधिकारी, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम, सचिव सुभाष सोकासने व मंडळाचे अन्य संचालक या मान्यवरांच्या उपस्थितीत तन्वी प्रदीप सागवेकर आणि प्रथमेश मनोहर मांडके या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे विज्ञान शिक्षक अमोल शशिकांत टाकळे व मुख्याध्यापक मंदार प्रभाकर सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.

टाइम्स स्पेशल

सदर जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल यशवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विकास कदम, सचिव योगेश कदम, खजिनदार अजित कदम, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, चिपळूण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील नागपूर येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg