loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलझर येथे ग्रामस्थांसोबत वनशक्तीच्या स्टॅलीन दयानंद यांनी संवाद साधला

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दिल्ली लॉबीच्या रुपाने येथील जमीन खरेदीसाठी येणारे गुंतवणुकदार म्हणजे सह्याद्रीच्या रांगांमधील समृध्द गावांना लागलेली कीड आहे. स्थानिकांनी पुढाकार घेवूनच ही कीड मुळापासून उचकटून फेकली पाहिजे. या लढ्यात कोलझर बरोबरच पंचक्रोशीतील गावांच्या पाठिशी ठामपणे उभा राहीन अशी ग्वाही वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलीन दयानंद यांनी कोलझर येथे दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिल्ली लॉबीच्या विरोधात कोलझर गावाने एल्गार पुकारला आहे. रक्ताच्या नात्याबाहेर कोणालाही जमीन विकणार नाही, अशी शपथ त्यांनी ग्रामदैवतासमोर घेतली आहे. त्यांच्या या लढ्याला पाठबळ देण्यासाठी ग्रामस्थांच्या विनंतीवरून स्टॅलीन आले होते. यावेळी स्थानिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘’सह्याद्रीच्या या समृध्द भागात जन्म घेणे भाग्याचे आहे. या भागाचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी स्थानिकांवरच आहे.

टाइम्स स्पेशल

आम्ही व्याघ्र कॉरीडॉरसाठी न्यायालयात दिर्घ लढा दिला. त्यानंतर हा परिसर इकोसेन्सिटीव्ह एरियामध्ये समाविष्ट झाला. असे असले तरी गाफील राहून चालणार नाही. दिल्ली लॉबीच्या रुपाने खूप मोठी आर्थिक लॉबी या समृध्द भागावर डोळा ठेवून आहे. ते आले तर येथील गाव, त्यातील गावपण, पर्यायाने जंगल आणि पर्यावरण नष्ट होणार आहे. त्यामुळे हे गुंतवणूकदार म्हणजे या भागाला लागलेली कीड आहे. स्थानिकांनी ती वेळीच काढून फेकून दिली पाहिजे. त्यांच्या लढ्याला आमच्यापरिने पूर्ण ताकदीने मदत दिली जाईल.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg