loader
Breaking News
Breaking News
Foto

कोनाळकट्टा येथे सिंचन विभागाच्या जागेत उत्खनन सुरू

तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील कोनाळकट्टा परिसरात महालक्ष्मी वीज निर्मिती प्रकल्पाकडे जाणार्‍या मार्गावर, सिंचन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राखीव जागेत सध्या मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन सुरू असल्याचे दिसून येत आहे. धरण क्षेत्रातील ही जागा संपादित आणि राखीव आहे. कोनाळकट्टा येथील संबंधित ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करून ट्रॅक्टर व डंपरद्वारे मातीची वाहतूक केली जात आहे. ही जागा सिंचन विभागाच्या मालकीची असल्याने आणि संवेदनशील क्षेत्रात येते. कोणत्याही प्रकारच्या उत्खननासाठी प्रशासकीय परवानगी आणि महसूल विभागाची ’रॉयल्टी’ भरणे अनिवार्य असते. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी सुरू असलेल्या कामाबाबत कोणतीही अधिकृत माहिती फलक किंवा सूचना नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg