loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये जिल्हास्तर नाट्य अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा

संगलट खेड (प्रतिनिधी) - खेड येथील सहजीवन शिक्षण संस्था संचालित आयसीएस महाविद्यालय आणि खेड तालुका पत्रकार संघ तसेच लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वा शहरातील नवोदित कलाकारांना नाटकासह चित्रपटात झळकण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी रविवार दि. १ फेब्रुवारी ते गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्हास्तरीय नाट्यअभिनय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेतील नवोदित कलाकारांना प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते डॉ. विजय केंकरे, अभिनेते, दिग्दर्शक संजय क्षेमकल्याणी, लेखक दत्ता सावंत यांच्याकडून अभिनयाचे धडे मिळणार आहेत. या कार्यशाळेतून तयार होणाऱ्या नवोदित कलाकारांना चित्रपट वा नाटकांमधून अभिनय सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे या नव्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी प्राप्त होणार असल्याची माहिती उत्तमकुमार जैन यांनी दिली. या कार्यशाळेत प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक निर्माते डॉ. विजय केंकरे, अभिनेते दिग्दर्शक संजय क्षेमकल्याणी, लेखक दत्ता सावंत प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थिना नाटकातील अभिनयासह चित्रपटातील अभिनयाचेही धडे देणार आहेत. यातील नवोदित कलावंतांना नाटक व चित्रपटात काम करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी संस्था कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, संस्था उपाध्यक्ष व एमबीए महाविद्यालयाचे चेअरमन नंदकुमार गुजराथी, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ऍड. आनंद भोसले, विश्वस्त विलास बुटाला यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

टाइम्स स्पेशल

या कार्यशाळेत पहिल्या ५० प्रशिक्षणार्थिना प्राधान्य देण्यात येणार असून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संस्था संचालक उत्तमकुमार जैन-९४२२३४४८५१, कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी-९०११००४७८३ यांच्याशी संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg