loader
Breaking News
Breaking News
Foto

नागोठणे येथील डॉ. नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळेला भागोजी ट्रस्टच्यावतीने भेट

वैभववाडी (प्रतिनिधी) - गेली अनेक वर्षे आदिवासीपाडे तसेच ग्रामीण भागातील समस्यांवर प्रचंड काम करणारे अशोक जंगले यांच्या माध्यमातून रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी नागोठणे येथील डॉ. नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळेला भागोजी ट्रस्टच्यावतीने भेट देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डोंगरगावकर भागोजी चॅरिटेबल ट्रस्टचे हक्काचे पाठीराखे राम जांगळे, सूर्यकांत जांगळे, संतोष जांगळे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याठिकाणी जवळपास 60-70 मुले पहिली ते सातवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. इतक्या लहानवयात आपल्या पालकांना सोडून ही मुले विविध कारणांनी इथे शिक्षण घेत आहेत. शासनाकडून या शाळेला अनुदान मिळत असले तरी अनेक सुखसोयींची आवश्यकता याठिकाणी आहे. आपण सामाजिक आणि भावनिक जाणीव असेल मंडळी आहोत. या आणि अशा अनेक आश्रमशाळा आहेत जिथे खरंतर आपली छोटीशी मदत अशा मुलांना खूप आधार बनून जाते.

टाइम्स स्पेशल

सदर भेटीनंतर या मुलांमधील शिस्त, नीटनेटकेपणा आणि स्वावलंबीपणा अगदी मनात भरला. सध्या जग घेत असलेली भरारी पाहता अशा घटकांकडे कोणी पाहत नाहीये, याची रुखरुख लागून राहते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलून अशा घटकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा इथून वाढीस लागतेय. आम्ही येणाऱ्या काळात अशा मुलांसाठी आणि परिसरासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत, आपले देखील हात सोबत जुळल्यास आमच्या इच्छेला बळ येईल, आधार होईल. चला सोबतीने निकडीची गरज असलेल्या घटकांना आधार देण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg