आबलोली (संदेश कदम) - ‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी पद्मश्री प्रसन्ना वैद्य हिला सन्मानित करण्यात आले. कोकणातील बहुपैलू विद्यार्थ्यांचा जाहीर गौरव करणारा, विद्यार्थीप्रिय सन्मान म्हणजे गोडबोले पुरस्कार हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० :०० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे आयोजित करण्यात आला होता. चतुरंग प्रतिष्ठानचा 'सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार' निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन यांच्या हस्ते पद्मश्री ला देण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रीय कीर्तनकार आणि व्याख्याते डॉ. चारुदत्त आफळे, डॉ. मिलिंद गोखले, प्रा. वैभव कानिटकर, यासह अनेक मान्यवर, प्रतिष्ठीत नागरिक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
शनि-रवि. दि. १३-१४ डिसेंबर रोजी ५९ कोकण शाळांतील एकूण २४५ विद्यार्थ्यांचे ग्रुप इंटरव्ह्यू पार पडले. या विद्यार्थ्यांमधून ३६ शाळांतील ३६ विद्यार्थ्यांची निवड सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या मुलाखतीसाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून भगीरथ संस्थेचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद गोखले आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वैभव कानिटकर यांनी काम पाहिले. सदर पुरस्कार वितरण सोहळा. सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, पाचशे रुपये किमतीची पुस्तके, रोख रू . १००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अतिशय समंजस, प्रामाणिक, स्पष्टवक्ती असणाऱ्या पद्मश्रीला भविष्यात डिझायनिंग शाखेचे शिक्षण घेऊन स्टुडिओ काढण्याचा मानस आहे. बुद्धिबळ खेळणे, चित्रकला, हस्तकला अश्या आवडी जोपासणारी पद्मश्री स्वामी विवेकानंद यांना आपले आदर्श मानते.पद्मश्रीने जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कराटे स्पर्धा, ज्युडो स्पर्धा, यांसारख्या विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवले आहे.
पद्मश्रीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे सर्वत्र कौतुक होते आहे. पद्मश्रीला तिच्या प्रशालेतील सर्व गुरुवर्य व तिच्या पालकांचे तिला उत्तम मार्गदर्शन लाभल्याचे तिने आपल्या भाषणामध्ये आवर्जून सांगितले. गोडबोले पुरस्कार मिळवायचा असा संकल्प तिने लहानपणी केला असल्याबाबतहि आपल्या भाषणात तिने सांगताना आपणा सर्वांचे आशीर्वादाने तो संकल्प पूर्ण होत असल्याची कबुली देऊन. मी चतुरंग प्रतिष्ठानचे कायम ऋणी राहणार असे तीनेआवर्जून यावेळी सांगितले. लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाईत, कार्याध्यक्ष सचिन बाईत, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश कदम, सचिव राकेश साळवी तसेच सर्व संस्थाचालक व मुख्याध्यापक डी .डी. गिरी आणि सर्व गुरुजन वर्ग यांनी पद्मश्रीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.