loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य नगर संचलन

रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रत्नागिरी नगर यांच्यावतीने शहरात शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण नगर संचलन करण्यात आले. शहरातील विविध वस्त्यांमधून स्वयंसेवकांनी एकत्र येत संघशक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. संध्याकाळच्या वेळेत निघालेल्या या संचलनामुळे शहरात शिस्तीचे व राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. तेली आळीच्या नाक्यावर सर्व स्वयंसेवकांची पथके शिस्तबद्ध रीतीने एकत्र आली आणि तिथून भुते नाक्यावरून वळून हे संचलन पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर पोहोचले. संपूर्ण संचलनादरम्यान स्वयंसेवकांनी गणवेशात, शिस्तबद्ध पंक्तीमध्ये संचलन करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी संचलन पाहण्यासाठी गर्दी केली होती. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणेचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg