loader
Breaking News
Breaking News
Foto

समृद्धी आंबेकरला चतुरंग सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार

आबलोली(संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इ.१० वी मधील विद्यार्थिनी कु.समृध्दी सुरेश आंबेकर हिला चतुरंग प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षी निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन , राष्ट्रीय कीर्तनकार व व्याख्याते डॉ.चारुदत्त आफळे , निवड समितीचे प्रतिनिधी डॉ.मिलिंद गोखले , डॉ.प्रसाद देवधर या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत गौरव चिन्ह , गौरव प्रमाणपत्र , रोख रक्कम व पुस्तकरूपी भेटवस्तू देऊन चतुरंग प्रतिष्ठान गोडबोले सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चतुरंग प्रतिष्ठान सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार वितरण समारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे नुकताच संपन्न झाला . न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची समृद्धी आंबेकर हिने चतुरंग सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच पत्रकार , मित्रपरिवार व सगेसोयरे आदींनी कु.समृध्दी आंबेकर व मार्गदर्शक शिक्षक तसेच आई - वडील यांचे अभिनंदन केले. सदरच्या चतुरंग गोडबोले सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार वितरण समारंभासाठी चतुरंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते , बहुसंख्य पालक व व शिक्षक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg