loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांच्या प्रचार तोफा आज थंडावणा

मुंबई. : राज्यातील सर्व 29महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून, संध्याकाळी 5.30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आज दिवसभर राज्यभरात राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं पाहायला मिळणार आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रचारात व्यस्त राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अखेरच्या दिवशी प्रचारासाठी जाहीर सभा, रोड शो, बाईक रॅली, पदयात्रा, तसेच घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे नेते, खासदार, आमदार यांच्यासह अनेक दिग्गज नेते विविध शहरांमध्ये प्रचार फेऱ्या मारत शेवटचा जोर लावणार आहेत. काही ठिकाणी स्टार प्रचारकांच्या सभांमुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये गर्दी आणि वाहतूक कोंडीचीही शक्यता आहे. महापालिका निवडणुका सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेच्या बनले असून, त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामं, पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, करप्रणाली, तसेच आगामी राजकारणाची दिशा ठरवणारे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार आहेत.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, सर्व महापालिकांसाठी येत्या गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे.पोलीस बंदोबस्त, संवेदनशील भागांमध्ये विशेष पथकांची नियुक्ती, तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.मतदानानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच शुक्रवारी मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी राज्यातील शहरी सत्ताकारणाचं चित्र स्पष्ट होणार आहे. कोणत्या पक्षाचा किती महापालिकांवर झेंडा फडकणार, कोणाला मोठा धक्का बसणार आणि कुणाचा विजयाचा गुलाल उधळणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg