loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त श्रीसातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ, नेमळे आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा दोन गटांत होणार असून लहान गट पाचवी ते सातवी या गटातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे स्वहस्ताक्षरात लेखन करावे तसेच मोठागट आठवी ते दहावी या गटातील विद्यार्थ्यांनी’ प्रतिज्ञा’ स्वहस्ताक्षरात लेखन करुन आपल्या प्रवेशिका मुख्याध्यापकांच्या सहीने श्रीसातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला, क्रीडामंडळ, नेमळे ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग या पत्यावर दि.२६ जानेवारीपर्यंत पाठवावे किंवा समक्ष पोहोच करावे, असे आवाहन अध्यक्ष आ.भि.राऊळ सर व कार्यकारी मंडळाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लहान गटातील व मोठ्या गटातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांला ५०० रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ४०० रूपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांक ३०० रूपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा ही विनंती. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल आरती गावडे मोबाईल क्रमांक ७८७५०२४४२४ यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg