loader
Breaking News
Breaking News
Foto

हत्ती मानव संघर्ष कमी करण्यासाठी हत्ती बाधित गावात सायरन अलर्ट प्रणाली कार्यान्वित

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग वनपरिक्षेत्रामध्ये वन्यहत्तीच्या उपद्रवामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उ‌द्देशाने हत्ती बाधित गावांमध्ये सायरन अलर्ट सिस्टिम बसविण्यात येत आहे. हाकारी गटातील मजूर व वनकर्मचारी दिवसा व रात्री वन्यहत्तीचा सातत्याने मागोवा घेत असून, त्यांना प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे वन्यहत्तीचा वावर असलेल्या गावांमध्ये सदर सिस्टिमद्वारे सायरन वाजवून नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येणार आहे. हत्ती गावाजवळ आल्यास किंवा येत असल्यास, हाकारी मजूर यांच्यामार्फत सायरन वाजवून शेतकरी व ग्रामस्थांना वेळेपूर्वी सतर्क करण्यात येईल. त्यामुळे नागरिक जागृत राहून आवश्यक खबरदारी घेऊ शकतील. सद्यस्थितीत सायरन अलर्ट सिस्टिममुळे स्थानिक पातळीवर वनविभागाबाबत सकारात्मक जनमत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचप्रमाणे, दिनांक 11.01.2026 रोजी पश्चिम बंगाल येथून हत्ती व्यवस्थापन मध्ये तज्ञ असलेल्या सदस्यांची हुल्ला टीम प्रशिक्षण देण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील हत्ती प्रवण क्षेत्रात दाखल झाली आहे. सदर प्रशिक्षणा अंतर्गत वनकर्मचारी व हत्ती हाकारा मजूर यांना वन्यहत्तीना मानवी वस्तीपासून जंगल क्षेत्राकडे कसे रोखून ठेवावे, तसेच वन्य हत्तींच्या हालचालींवरून त्यांचा स्वभाव कसा ओळखावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. सदर टीमकडून हाकारी गटातील मजूर व वनकर्मचारी यांना रात्रीच्या वेळी विविध साधने व माध्यमांचा वापर करून प्रात्यक्षिका‌द्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg