loader
Breaking News
Breaking News
Foto

इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असल्याने लक्ष्य द्या , हॉल तिकीटबद्दल महत्त्वाची अपडेट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या हॉल तिकीटसंर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 10 फेब्रुवारी 2026 पासून बारावीच्या लेखी परीक्षा सुरु होणार आहेत. बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हॉल तिकीट देण्यात येणार आहे. पण महाविद्यालयांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाची सूचना दिली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीटसोबत प्रिंटमध्ये महाविद्यालयांना द्यावे लागणार आहे. त्याबद्दलची सूचनाही मंडळाने महाविद्यालयांना दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महत्त्वाचे मंडळाने स्पष्ट केलं आहे की, महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रिंट हॉल तिकीट देत असताना त्यांच्याकडून कुठलाही प्रकारेच शुल्क आकारू शकत नाहीत. त्यामुळे 12 वी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, ऑनलाइन हॉल तिकीटावर त्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यांना प्रिंट हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. महत्वाचे म्हणजे या हॉल तिकीटवर मुख्यध्यापकांची सही असणे बंधनकारक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर मुख्याध्यापकांची सही नसेल तर त्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही. मंडळाने स्पष्ट केलं आहे की, 12 परीक्षेच्या हॉल तिकीटवर विद्यार्थ्याचा फोटो आणि त्याच्या बरोबर खाली मुख्याध्यापकांची सही शिक्का आवश्यक असेल आणि तेच हॉल तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे.

टाइम्स स्पेशल

छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर,मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती, कोकण, मुंबई या ठिकाणाहून असंख्य विद्यार्थी 12 वीची परीक्षा देणार आहे. त्यासाठी लवकरच हॉल तिकीट विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसंच कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा मंडळाने दहावीचे 31 तर बारावीच्या 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द केली आहे. तसंच भरारी पथकांचीही संख्या वाढवण्यात आली असून सीसीटीव्हीची करडी नजर विद्यार्थ्यांवर असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg