loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात बाहेर आपला दवाखाना, आत साडीचं दुकान! त्या साड्या गद्दारांना नेसवा, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता घणाघात

ठाणे (अमोल पवार) : मुंबई ठाणे भिकारी करायचे. महापालिकेच्या तिजोऱ्या खणून काढायच्या हे दोन सुरतवाले तिजोऱ्या खाली करायच्या, नगरसेवक पदासाठी करोडो रुपये वाटायचे. साताऱ्याचे ड्रॅग फॅक्टरिवर धाड पडली. शिवसेनेची २५ वर्षे शिवसेना भाजप युतीत सडली पूर्वीचा भाजप होता तो मेला आहे. आजच राष्ट्र प्रथम चोर प्रथम भ्रष्टचारी प्रथम गुंड अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली. कल्याणमध्ये घराघरात पैशाची पाकिटं जात आहेत, निवडणूक संपलीय नेमणुका सुरु झाल्या आहेत. आपण मतदान करतोय म्हणजे सरकार निवडतोय असं वाटत पण कदाचित शेवटची निवडणूक असेल. यापुढं देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही, गेली 25 वर्षं ठाणेकरांनी ठाणे शिवसैनिकांकडे दिलं होतं, गद्दाराकडे दिलं नव्हतं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत ठाण्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आम्ही दोन भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलो आहोत. आमची युती जागावाटपासाठी झालेली नाही. मराठी माणूस जागा करण्यासाठी युती झालेली आहे. आपण सर्वजण एक मातीची लेकरं आहोत. आमचा विरोध दुसऱ्या भाषेला विरोध नाही. आमच्या घरात घुसून दादागिरी करणाऱ्यांना उत्तर दिलं नाही तर शिवाजी महाराजांचं नाव कसं घ्यायचं. आम्ही सहनशील आहोत, सगळ्यांना आपलं मानत आलो. दादागिरी करणाऱ्यांना कानफाटा असं म्हटलं तर काय चुकलं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ज्या माणसानं शिवसेनेशी गद्दारी केली, तोच माणूस ठाण्याशी गद्दारी करतोय. हजार एकर जमीन त्यांनी देऊन टाकली. बाहेर पडल्यावर बावनकुळे म्हणतात ही जमीन माहिती नाही. मुख्यमंत्री असताना वनजमीन कोणत्या उद्योगपतीला दिली नव्हती. माझ्या काळात जेवढी जंगलं वाढवली तेवढं कोणीच केलं नसेल. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

टाइम्स स्पेशल

कोस्टल रोड आपण केलेला आहे, मुंबईकरांच्या पैशातून केला आहे, त्याचं श्रेय ते घेत आहेत. हिंदूह्रदयसम्राट आपला दवाखाना ही योजना आपली होती. सरकार पाडलं आणि फित कापली. फित कापली ती कापली ठाण्यात काय झालं, ठाण्यात आपला दवाखान्यात गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलं. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आत गेलो तर साड्याच दुकान, नेसवा त्या गद्दाराला आणि त्याची धिंड काढा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. उद्या जर का काही झालं तर ठाण्यातील गद्दार निघून फाईव्हस्टार शेतात हेलिकॉप्टर घेऊन निघून जातील. देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला, तिसरे जातील काका मला वाचवा म्हणत बारामतीला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी म्हटलं. गेली 25 वर्षे मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिलं, ठाणे शिवसेनेकडे दिलेलं, गद्दाराकडे दिलं नव्हतं. हा गद्दार निघेल तुम्हाला माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. तुम्ही फसलात मी देखील फसलो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. निवडणूक ठाकरे बंधूंची नाही आम्ही तुमच्यासाठी आहोत. असेही ठाकरे म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg