loader
Breaking News
Breaking News
Foto

केतकी-करंबवणे खाडीत दोन सक्शन पंप जप्त

संगलट खेड (प्रतिनिधी) - चिपळूण तालुक्यातील केतकी करंबवणे खाडीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकाने खाडीत धाड टाकत दोन सक्शन पंप जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. केतकी-करंबवणे खाडीत सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वी शासनाकडून ड्रेझरच्या माध्यमातून वाळू उपशासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली होती. मात्र या खाडीत हातपाटी तसेच सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही गेल्या काही दिवसांपासून रात्री अंधाराचा फायदा घेत सक्शन पंपांच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. महसूल बुडत असल्याचा आरोप होत होता. तसे लिलावाद्वारे अधिकृतरीत्या वाळू उपसाची परवान घेतलेल्या व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर अवैध वाळू उत्खननाविरोधात जोरदार ओरड सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नियुत केलेल्या पथकाने केतकी व करंबवणे खाडीत धाड टाकली. या कारवाईदरम्यान दोन ठिकाणी सक्शन पंप आढळून आले. हे पंप नेमके कोणाचे आहेत, याचा अद्याप तपास सुरू असून संबंधितांचा शोध घेतला जात आहे. सध्या जप्त करण्यात आलेले सक्शन पंप महसूल विभागाच्या ताब्यात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. याबाबत बोलताना तहसीलदार प्रविण लोकरे यांनी सांगितले की, "अवैध वाळू उत्खननाचा कोणता प्रयत्न सहन केला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाल पाठीशी घातले जाणार नाही."

टाइम्स स्पेशल

यापुढे ही खाडीत सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करताना आढळून आल्यास ते तत्काळ जप्त करण्यात येतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर व उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg