loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशीत परदेशी पर्यटकांची रेलचेल; जर्मन पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीची भुरळ

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : कोकणचा निसर्ग आणि इथल्या साध्या, सुटसुटीत जीवनशैलीचे आकर्षण आता सातासमुद्रापार पोहोचले आहे. दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथे सध्या परदेशी पर्यटकांचा राबता वाढला असून, विशेषतः जर्मनीहून येणाऱ्या पर्यटकांच्या विविध गटांनी या भागाला आपली पसंती दर्शवली आहे. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत पर्यटकांचे हे गट ८ ते १० दिवसांच्या मुक्कामासाठी येथे दाखल होत आहेत. हे पर्यटक केवळ फिरण्यासाठी येत नसून, इथल्या ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी ठराविक कालावधीसाठी मुक्काम करतात. डिसेंबरमध्ये सुरू झालेला हा ओघ एप्रिल महिन्यापर्यंत सातत्याने सुरू असतो. एकामागून एक येणारे पर्यटकांचे हे गट स्थानिक रिसॉर्ट्समध्ये ८ ते १० दिवस राहून इथल्या शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद लुटत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुक्कामादरम्यान हे पर्यटक साटेली भेडशीच्या बाजारपेठेत फेरफटका मारतात आणि स्थानिक वस्तूंची खरेदी करतात. ग्रामीण खाद्यपदार्थांची चव चाखण्यात त्यांना विशेष रस असून, येथील अस्सल जेवणावर ते ताव मारताना दिसतात. विशेष म्हणजे, गावातील जत्रोत्सवांमध्येही हे परदेशी पाहुणे उत्साहाने सहभागी होत आहेत. ढोल-ताशांचा गजर, पालखी सोहळा आणि जत्रेतील चैतन्य पाहून हे पर्यटक भारावून जात असून, येथील पारंपरिक जीवनशैली जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

टाइम्स स्पेशल

साटेली भेडशीसारख्या ग्रामीण भागात परदेशी पर्यटकांचा वाढता वावर हा स्थानिक पर्यटनासाठी सकारात्मक बदल मानला जात आहे. या पर्यटकांच्या सातत्यपूर्ण भेटीमुळे स्थानिक छोटे व्यावसायिक यांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. जागतिक नकाशावर साटेली भेडशीचे नाव एक 'रुरल टुरिझम' केंद्र म्हणून अधोरेखित होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg