loader
Breaking News
Breaking News
Foto

AWS करिअर टूर्स स्पर्धेत डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टाने पटकाविला द्वितीय क्रमांक

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या करिअर कट्टा या विभागांतर्गत AWS करिअर टूर्स या स्पर्धेत कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागाने द्वितीय क्रमांक पटकाविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या करिअर कट्टा या विभागांतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने करिअर कट्टा विभागामार्फत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त करिअर, कॉम्प्युटर्स, डेटा स्टोरेज, सर्वर, क्लाऊड कॉम्पुटिंग, फायबर ऑप्टिक्स, आय. पी. ऍड्रेस इ. विषयांवर आधारित AWS करिअर टूर्स ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आमच्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा च्या करिअर कट्टा विभागाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. सदर स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

सर्व सहभागी विद्यार्थ्यांना करिअर कट्टा विभाग प्रमुख प्रा. श्रुती कुंभार व विभाग सहाय्यक प्रा. कांचन खानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा चे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनिल नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रविंद्र पावसकर व सर्व संस्था संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य रविंद्र गावडे, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg