loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न; गणेशप्रसाद गवस

साटेली (प्रतिनिधी) -दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटीबद्ध असतो, त्यामुळे तालुक्यात अनेक विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामांसाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे सहकार्य मिळाल्याचे शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले. मंगळवारी सकाळच्या सत्रात आमदार निधीतून मंजूर झालेली हेदुसवाडी येथील सार्वजनिक विहीर, सासोली, हेडूस ते गोवा रस्ता तर मणेरी तेलीवाडी ते राष्ट्रोळी मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, मणेरी तळेवाडी ते आंबेली रस्ता अशा विहीर व रस्ता भूमिपुजने करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यात अनेक गावात विकास कामांची भूमिपूजने करण्यासाठी भरगोस निधी मिळाला आहे. आमदार दिपक केसरकर यांनी नेहमीच दोडामार्ग तालुक्याला झुकते माप दिलेले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांची सुद्धा चांगली साथ मिळाली आहे. असे गवस यांनी सांगितले. यावेळी गणेशप्रसाद गवस सह उपतालुका प्रमुख बाबाजी देसाई, सज्जन धाऊसकर, लक्ष्मीकांत करमळकर,अरुण नाईक, दीपक गवस, आनंद धाऊसकर, विशांत तळवणेकर, सरपंच सिद्धी कांबळे, उपसरपंच विशाल परब, शेखर भुजबळ, फटी नाईक, सुनील मांजरेकर, सुमिता नाईक, साक्षी तळवणेकर, विद्या मांजरेकर, गीता राणे, पल्लवी तळवडेकर सह आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg