loader
Breaking News
Breaking News
Foto

दादासाहेब सरफरे विद्यालयामध्ये तालुकास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन

बुरंबी (संगमेश्वर) येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी- शिवने येथे मंगळवार दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत तालुकास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इयत्ता ४ थी ते ५ वी, ६ वी ते ७वी व ८ वी ते १० वी या गटातील विद्यार्थ्यांच्या कला विषयक गुणांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्याना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी संस्थेने व्यासपीठ दिले आहे. नाविण्यपुर्वक आशयपुर्ण निसर्ग चित्र असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून त्याना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व सन्मानचिह देवून गौरविण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यानी या निसर्ग चित्र स्पर्धेत सहभागासाठी प्रशालेचे आर्ट टीचर प्रदीप कृष्णा शिवगण सर यांचेकडे नोंदणी करावी. संपर्क क्रमांक ८६६८७३७९४३ असून या स्पर्धेसाठी बहुसंखेने विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा असे आवाहन दिलीप मोरे (अध्यक्ष), प्रताप नारायण देसाई (उपाध्यक्ष), शरद गोविंद बाईत (सरचिटणीस), दिनेश शामराव जाधव (स्कुल कमिटी अध्यक्ष) व संचालक तसेच मुख्याध्यापक प्रकाश विरकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg