loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गच्या ज्वलंत प्रश्नांसाठी तत्काळ 'आमसभा' लावा; काँग्रेस तालुकाध्यक्ष गुणाजी गवस आक्रमक

भेडशी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील जनतेचे विविध प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तत्काळ 'आमसभा' आयोजित करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुणाजी गवस यांनी केली आहे. लोकशाही मार्गाने समस्या मांडण्यासाठी आमसभा हे प्रभावी माध्यम असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून ही सभा न झाल्याने तालुक्यात प्रश्नांचा डोंगर साचला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील परिस्थिती मांडताना गवस म्हणाले की, "सध्या दोडामार्गमध्ये वन्य हत्तींचा धुमाकूळ वाढला असून शेतकरी आणि ग्रामस्थ दहशतीखाली वावरत आहेत. आडाळी एमआयडीसीचा प्रश्न, तिलारी परिसरातील रखडलेला पर्यटन विकास आणि तालुक्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था यांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे." स्थानिक आमदारांकडून या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग तालुक्याची शेवटची आमसभा ५ जून २०१५ रोजी झाली होती. त्यानंतर गेल्या सुमारे १० वर्षांत एकदाही आमसभा बोलावण्यात आलेली नाही. ही बाब अत्यंत धक्कादायक असून, सर्वसामान्यांना आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठच उरलेले नाही, अशी व्यथा गवस यांनी व्यक्त केली.

टाइम्स स्पेशल

तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन आमसभा आयोजित करावी. जर ही मागणी मान्य न झाल्यास, काँग्रेस पक्षाच्या वतीने जनतेच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही गुणाजी गवस यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg