loader
Breaking News
Breaking News
Foto

'एआय' मुळे रत्नागिरी पोलिसांच्या तपासाला मिळणार दिशा

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करून "रेड" (रत्नागिरी ॲडव्हान्स इंटिग्रेटेड डाटा सिस्टिम) हे नाविन्यपूर्ण ॲप्लिकेशन विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पोलिसांसाठी करून रत्नागिरी पोलिसांनी एक नवा इतिहास रचला आहे. यात देव - दृष्टी, देव - रूपरेखा आणि बीएनएस अनॅलिसिस हे प्रकार असून या तंत्रज्ञानाचा वापर करून तपास अधिक गतिमान होणार आहे. रत्नागिरी पोलीस दलाने अशा प्रकारचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केलेला हा भारतातील पहिलाच प्रयोग असून त्याद्वारे अन्वेषणात नवीन दिशा पोलीस विभागाला दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिक केंद्रित पोलिसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन, प्रोजेक्ट व डिजिटल ॲप्लिकेशन्स सुरू केले आहेत. या उपक्रमांमध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याविषयी पोलीस अधीक्षक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. 'एआय'तंत्रज्ञान अंतर्गत "रेड" हे नाविन्यपूर्ण डिजिटल ॲप्लिकेशन रत्नागिरी पोलीस दलाने विकसित केले आहे. या ॲपमधील पहिला प्रकार म्हणजे देव दृष्टी. देवदृष्टी या तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यामधील बेपत्ता (मिसिंग) असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येऊ शकतो व जिल्ह्यामधील हिट्री शीटर्स, वॉन्टेड आरोपी, एनडीपीएस मधील आरोपींचे फोटो या ॲपमध्ये डेटाबेस स्वरूपात आहेत. या ॲपद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून एका आरोपीचे विविध १०८ प्रकारचे इमेजेस बनवले जाऊ शकतात, जेणेकरून पोलीस फिल्डवर जेव्हा आरोपीला शोधण्यासाठी जातात तेव्हा आरोपीने त्याची वेषभूषा बदलली असली , तरी (यामध्ये आरोपीला दाढी काढून, केस वाढवून, लांब केस ठेवून, टक्कल करून आरोपी फटारा किंवा लपून राहून शकतो.) अशावेळी त्याला ओळखण्यासाठी याचा वापर करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

देव-रूपरेखा या प्रकारात आरोपी फक्त कुणाला, तरी दिसले आहेत किंवा त्यांचा पोलीस ठाण्यामार्फत एका पोलीस स्केच आर्टिस्टकडून चित्र (स्केच) तयार करण्यात आले आहे किंवा एखादा मृतदेह, सडलेले मानती शरीर किंवा सांगाडा याचा फोटो असला तरी हा फोटो देव रूपरेखामध्ये अपलोड करून त्याची नवीन इमेज तयार करता येते. याद्वारे तपासाला दिशा मिळणार आहे. बीएनएस अनॅलिसिस या प्रकारात पोलीस कामकाजात वापरासाठी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मध्ये एखादे कलम ओळखता आले नाही, तर या ॲप्लिकेशनमधील सर्च बारमध्ये फक्त केलेल्या गुन्ह्याचे वर्णन लिहिले तर लागलीच त्यामध्ये कलम सहित सजेशन येते. (उदाहरणार्थ मर्डर सर्च केले, तर त्यापुढे सर्च बारमध्ये कलम १०३ असे येते.) हे "रेड" ॲप रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार यांना तपास कामासाठी उपयोगी ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg